इस्लामपूर/सांगली : इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.पाटील म्हणाले, या शहराची नगरपालिका १६८ वर्षांची आहे. राजपत्रात या शहराचे नाव उरुण-इस्लामपूर असे आहे. त्यामुळे फक्त इस्लामपूर असे म्हणणारांनी उरुण-इस्लामपूर पॅटर्न म्हणावे, तसेच कोरोना बाधा आणि संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्री नव्हे तर पंचसूत्रीचा अवलंब करण्यात आला हेसुद्धा लक्षात घ्यावे असा चिमटा पाटील यांनी काढला.
corona virus -इस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 2:44 PM
इस्लामपूरच्या कोरोना मुक्तीला आता राजकीय श्रेयवादाची किनार येऊ लागली आहे.इस्लामपूर नव्हे तर उरुण-इस्लामपूर पॅटर्न आणि त्रिसूत्री नव्हे पंचसूत्रीचा अवलंब केला म्हणून शहर कोरोनामुक्त झाले असे सांगत आज नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पालिका बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोले मारले.
ठळक मुद्देइस्लामपुरच्या कोरोना मुक्तीला राजकीय श्रेयवादाची किनारनगराध्यक्षानी दिले जयंतरावांना टोले