शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

corona virus : चार महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 3:24 PM

गेल्या महिन्यापर्यंत वाढत असलेला कोरोनाचा कहर कमी होत असून, सध्या सर्वाधिक दिलासादायक चित्र समोर येत आहे. गुरुवारी ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तसेच मृत्यूची संख्याही कमी होत, तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे चार महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंदतिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १२२ जण कोरोनामुक्त

सांगली : गेल्या महिन्यापर्यंत वाढत असलेला कोरोनाचा कहर कमी होत असून, सध्या सर्वाधिक दिलासादायक चित्र समोर येत आहे. गुरुवारी ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तसेच मृत्यूची संख्याही कमी होत, तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनाच्या संख्येत लक्षणीय घट होतानाच, बाधितांचे प्रमाणही घटत चालल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. गेल्या महिन्यापासून सरासरी २५० ते ३०० वर असलेली रुग्णसंख्याही कमी होत असून गुरुवारी ११३ जण बाधित आढळले आहेत. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाणही कायम असून, एकाच दिवसात सर्वात कमी रुग्णसंख्या, तसेच सर्वात कमी बळींची संख्या, असे दिलासादायक चित्र दिसून आले.जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून, यात तासगाव तालुक्यातील दोघांचा, तर शिराळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १६३१ वर पोहोचली आहे.आरोग्य विभागाच्यावतीने नियमित चाचण्या घेण्यात येत असून आरटीपीसीआरअंतर्गत १०८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २०८९ चाचण्या घेण्यात आल्या, त्यातून ५७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी २१२ जणांची प्रकृती चिंताजनक असून यातील १६५ जण ऑक्सिजनवर, ९ जण हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर, तर ३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील कोल्हापूर, मुंबई आणि विजापूर येथील पाचजणांना कोरोनाचे निदान झाले आहे. 

  • आतापर्यंतचे एकूण बाधित ४४८६८
  • उपचार घेत असलेले १८६८
  • कोरोनामुक्त झालेले ४१३६९
  • आतापर्यंतचे एकूण मृत्यू १६३१ 
  • गुरुवारी दिवसभरात...
  • सांगली ११
  • मिरज ३
  • वाळवा २५
  • खानापूर १४
  • तासगाव १३
  • कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी ११
  • कडेगाव ८
  • आटपाडी ६
  • मिरज ५
  • जत ३
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली