इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करून संपर्क साखळी तोडण्यासाठी इस्लामपूर शहरात रविवारपासून पुन्हा तीन दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे रविवारी दिवसभर इस्लामपूर शहर पुन्हा शटरडाऊन झाले होते. वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.शहरात गेल्या तीन दिवसात जवळपास ४० रुग्णांची भर पडली आहे. उरुण परिसरासह महादेवनगर, राजारामनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, मंत्री कॉलनी, यल्लम्मा चौक, गांधी चौक, मोमीन मोहल्ला, शिराळा नाका, शिवनगर अशा विविध भागात हे रुग्ण आढळून आले आहेत.कोरोना संसर्गाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेवरून प्रशासनाने पुन्हा तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्याची सुरुवात रविवारी झाली. शहराच्या सर्व भागातील छोटे-मोठे व्यवसाय हे पूर्ण बंद होते. रस्त्यांवर तुरळक प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू होती. मुख्य चौकात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. अधिकारी शहरभर गस्त घालत होते.
corona virus : इस्लामपूर शहर पुन्हा शटरडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 6:30 PM
इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करून संपर्क साखळी तोडण्यासाठी इस्लामपूर शहरात रविवारपासून पुन्हा तीन दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात ...
ठळक मुद्देइस्लामपूर शहर पुन्हा शटरडाऊनवैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध या अत्यावश्यक सेवा सुरू