सांगली : महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते त्यांचा कोविड योध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मिरजेतील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
आयुक्त कापडणीस यांनी कोविडच्या गंभीर परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा २४ तास अलर्ट केली. सर्वसामान्य रुग्णांची बेडसाठी होणारी हेळसांड पाहता आयुक्त कापडणीस यांनी अवघ्या सात दिवसातच आदीसागरमध्ये १२० बेडचे पहिले कोविड केअर सेंटर उभारले तिथे ८०० हुन अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.
या त्यांच्या कार्याची दखल घेत मिरजेतील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील यांनी आयुक्त कापडणीस यांचा कोविड योध्दा म्हणून विशेष पुरस्काराने सन्मान केला.
यावेळी महापौर गीता सुतार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक योगेंद्र थोरात, विष्णू माने, संतोष पाटील, राहुल पवार उपस्थित होते.