शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

corona virus : सांगलीतील तरुणांनी साकारला अनोखा टेबल रोबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:44 PM

कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी रुग्णसेवेमध्ये निर्माण झालेल्या अडचणींवर मात करीत सांगलीतील काही तरुणांनी अथक् प्रयत्नांमधून अनोखा टेबल रोबोट साकारला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णापासून दूर राहूनही त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना औषधांचा डोस देणे, त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरविणे या रोबोटमुळे शक्य झाले आहे. मिरजेच्या कोविड रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देसांगलीतील तरुणांनी साकारला अनोखा टेबल रोबोट मिरजेच्या कोविड रुग्णालयात प्रयोग यशस्वी

अविनाश कोळीसांगली : कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी रुग्णसेवेमध्ये निर्माण झालेल्या अडचणींवर मात करीत सांगलीतील काही तरुणांनी अथक् प्रयत्नांमधून अनोखा टेबल रोबोट साकारला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णापासून दूर राहूनही त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना औषधांचा डोस देणे, त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरविणे या रोबोटमुळे शक्य झाले आहे. मिरजेच्या कोविड रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी झाला आहे.मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधणाऱ्या सांगलीतील अक्षय रेवणकर, ऋषभ चौगुले, पूजा काशीद, अभिषेक सुतार, स्वराज चव्हाण, मैत्रेय गोखले या सहा तरुणांना कोरोनाने संधी दिली. कोरोना काळात कोविड रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या जिवाची एकीकडे घालमेल, तर दुसरीकडे रुग्णांना वाटू लागलेली गैरसोयीची भीती, अशा दोन्ही गोष्टींवर मार्ग काढत या तरुणांनी एक दूत रोबोट तयार केला.

त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन या रोबोटची माहिती दिली. त्यांना या रोबोटबद्दल कुतूहल वाटले. कोविड रुग्णालयात याचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले. प्रयोगावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही अपेक्षा रोबोटबाबत व्यक्त केल्या. त्या अपेक्षांमधून रोबोटमध्ये बदल होत गेले आणि एक परिपूर्ण सेवेकरी रोबोट तयार झाला.डॉक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्यात हा रोबोट एक दूत असल्याप्रमाणे काम करीत असल्याने, त्याचे नामकरण दूत रोबोट असे करण्यात आले. अल्पावधितच या रोबोटने रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मने जिंकली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या आदेशाने मागील २0 दिवसांपासून हा रोबोट मिरज कोविड रुग्णालयात वापरला जात आहे. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाकवच म्हणून हा रोबोट काम करीत आहे.हा रोबोट बनविण्यासाठी तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे आवश्यक साहित्य मिळणे कठीण बनले होते. येथील उद्योजक अजय खांबे यांनी या तरुणांना आवश्यक मदत व साहित्य पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. याकामी मिरज सिव्हिलमधील परिचारिका वंदना शहाणे यांनीही त्यांना सहकार्य केले.एकावेळी ३0 रुग्णांची सेवाएकदा चार्ज केल्यानंतर हा रोबोट ३0 रुग्णांची दिवसभरातील सर्व सेवा पुरविण्यास सक्षम आहे. डॉक्टर व परिचारिकांना केवळ या टेबल रोबोटमध्ये आवश्यक गोष्टी ठेवून कमांड द्यावी लागते.रोबोटची वैशिष्ट्ये

  • या रोबोटमध्ये ४ ट्रेज् आहेत, ज्यामध्ये ८ ताटे ठेवता येऊ शकतात.
  • रोबोटच्या दर्शनी बाजूस स्क्रीन बसविण्यात आला आहे.
  • या स्क्रीनद्वारे डॉक्टर, कर्मचारी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलप्रमाणे बोलू शकतात.
  • यामध्ये ७ इंची डिस्प्ले आणि दोन्ही बाजूस कॅमेरा बसविला आहे.
  • छोट्या जागेतूनही हा रोबोट सहज जाऊ शकतो
  • एकदा सेवा दिल्यानंतर रोबोट पूर्ण सॅनिटाईज केला जाऊ शकतो. याला १२ व्होल्ट आॅपरेटेड बॅटरी आहे.
  • चार्ज करण्यासाठी कमित कमी कालावधी लागतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRobotरोबोटSangliसांगली