येथील बचाक्कानगर येथे फेब्रुवारी एका मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एका रक्षाविसर्जन कार्यक्रमात महिला एकत्र आल्यानंतर तेथील चार ते पाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आढळून आले होते. बचाक्कानगर वसाहतीत आतापर्यंत सुमारे २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत; तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सुमारे ४०० लोकांची १५ कॅम्पच्या माध्यमातून अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. गावातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व लवकरात लवकर रुग्णांची माहिती मिळावी यासाठी गुरुवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी तीनपर्यंत कोविड टेस्टिंग कॅम्पचे आयोजन केले आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांनी आपली तपासणी करून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मोरे यांनी केले आहे.