सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात शहादा तालुक्यातील मनदूर येथील चार जणांचा समावेश आहे. याबरोबरच कुंडल, वांगी, आणि मांगले याठिकाणीही नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 189 झाली.जिल्ह्यात मंगळवारी नव्याने चार कोरोना रुग्ण आढळून आले. किनरेवाडी (ता. शिराळा), विहापूर (ता. कडेगाव) येथील प्रत्येकी एक, तर निंबवडे (ता. आटपाडी) येथील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १८२ झाली.
शिराळा तालुक्यातील किनरे वाडी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव आला तो काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आला होता. विहापुर येथील ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा, सून व दोन नातवासह ही वृद्ध व्यक्ती २ जून रोजी मुंबईहून विहापुरला आले होते. 3 जून रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने मिरजेच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तर निंबवडे येथील ५८ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 189 झाली असून त्यापैकी शंभर रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मंगळवारी आष्टा झोळंबी वसाहतीतील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. तर सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले