सांगली : येथील समस्त जैन समाजाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व डॉक्टरांच्या सहकार्याने अवघ्या आठ दिवसांत ५० बेड क्षमतेच्या भगवान महावीर कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. येथे माफक दरात रुग्णांवर उपचार केले जाणार असून, दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना सवलत दिली जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक सुरेश पाटील यांनी दिली.डॉ. रवींद्र वाळवेकर यांच्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये हे सेंटर सुरू होत आहे. त्यात आयसीयुमध्ये १३ बेड असून, ६ व्हेंटिलेटर व ७ हायफ्लो नेझल आॅक्सिजन यंत्रे आहेत. अनेक नामवंत डॉक्टरांनी कोविड सेंटरची जबाबदारी घेतली आहे. या सेंटरसाठी राधेकृष्ण एक्स्ट्रॅक्शन्स लिमिटेड, राजेंद्र घोडावत फौंडेशन, सुरेश पाटील, सुभाष बेथमुथा, वसंतलाल शाह, ओसवाल बंधू, जैन समाज प्रतिष्ठान, गिरीश चितळे, मकरंद चितळे, अशोक बाफना, रोहिणी ट्रेडिंग, अतुल सराफ, अजित पाचोरे, संभाजी चव्हाण, पोपटराव खरमाटे, श्री जैनाचार्य विद्यासागरजी प्रतिष्ठान यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे.
coronavirus: जैन समाजाच्या पुढाकाराने उभारले कोविड रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:57 AM