शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

CoronaVirus InSangli : महापालिका क्षेत्रात ४०० जण होम क्वारंटाईन, आकडा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 2:22 PM

महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईसह परराज्यांतून तीन हजाराहून अधिक नागरिक आले आहेत. यापैकी सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. येत्या काळात परजिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याची माहितीही घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात ४०० जण होम क्वारंटाईन, आकडा वाढणार उल्लंघन केल्यास २८ दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईन

सांगली : महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईसह परराज्यांतून तीन हजाराहून अधिक नागरिक आले आहेत. यापैकी सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. येत्या काळात परजिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याची माहितीही घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

दरम्यान, होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना २८ दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.

१५ मार्चपासून घर टू घर सर्व्हे हाती घेतला होता. या सर्व्हेत २९८ जण परदेशातून आलेले नागरिक आढळले होते. १८ मेपर्यंत सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात ३ हजार १६० लोक आले आहेत.

यात पुण्यातून १५५९, मुंबईतून ७०५, इतर जिल्ह्यांतून ३९८, तर परराज्यांतून आलेल्या ४९८ नागरिकांचा समावेश आहे. यापैकी २७६६ जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला असून सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.आयुक्त नितीन कापडणीस यांनी वॉर्ड समन्वयकांना नगरसेवकांची बैठक घेण्याची सूचना केली. वॉर्डनिहाय परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईनचे आदेश दिलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे.

ही यादी वॉर्ड नियंत्रण समिती, नगरसेवकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. समितीच्या सदस्यांनी होम क्वारंटाईनमधील नागरिकांची नियमित भेट घेऊन, त्यांच्याकडून नियमांचे पालन होते की नाही, याची खातरजमा करायची आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती तातडीने आरोग्य विभागाकडे कळवावी. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या सूचनेनुसार दहा समन्वयकांचे पथक तयार करून, होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.नियंत्रण कक्षाला माहिती कळवा : नितीन कापडणीसजिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना २८ दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जाणार आहे.

होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरत असेल, तर नागरिकांनी त्याची माहिती संबंधित प्रभागाचे नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी. तसेच नियंत्रण कक्षाकडील टोल फ्री क्रमांक १८००२३३२३७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली