शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

CoronaVirus InSangli : कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये तीनशे खाटा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:51 PM

कोविडचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजून मर्यादित असली तरी, मिरजेतील वॉन्लेस, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रत्येकी ९० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मिरजेतील खासगी रुग्णालयांनीही कोविड रुग्णांसाठी खाटा देण्याची तयारी दर्शविली आहे.

ठळक मुद्देकोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये तीनशे खाटा राखीवउपचार सुविधा देण्याची खासगी रुग्णालयांची तयारी

मिरज : कोविडचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजून मर्यादित असली तरी, मिरजेतील वॉन्लेस, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रत्येकी ९० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मिरजेतील खासगी रुग्णालयांनीही कोविड रुग्णांसाठी खाटा देण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्यात मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने, शासकीय रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा कोविड रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राखीव खाटांवर नियंत्रित दराने कोविड रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. या निर्णयास मोठ्या शहरातील काही खासगी रुग्णालयांनी विरोध केला आहे. मिरजेतील खासगी रुग्णालय चालकांनी मात्र कोविड रुग्णांसाठी उपचार देण्याची तयारी असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या आतापर्यंत मर्यादित आहे. मिरज कोविड रुग्णालयात सुमारे तीनशे रुग्णखाटा आहेत. सिव्हिलची यंत्रणा अपुरी पडत असल्यास कोविड रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील खाटा व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने आणीबाणीच्या प्रसंगासाठी मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील ९० बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वॉन्लेसचे संचालक डॉ. नथानिएल ससे यांनी, आवश्यकता भासल्यास कोविड रुग्णांवर उपचाराची तयारी असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या पाचशेवर गेल्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या ५० ते १०० खाटांच्या मोठ्या खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचाराचे प्रशासनाने नियोजन केले आहे. कोरोना साथीमुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने खासगी रुग्णालयांतील खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे खासगी रुग्णालय चालकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली