सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवरील ७५ लहान-मोठे रस्ते बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.
या मार्गावरील वाहतुक पर्यायी ३४ मार्गावर वळविण्यात आली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे ३ मेपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून आतंरजिल्हा व आंतरराज्य जोडलेले ७५ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत.
या मार्गावरील वाहतुक पर्यायी ३४ रस्त्यावर वळविण्यात आली आहे. हे रस्ते आपत्कालीन व अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवेतील वाहनांसाठीच खुले राहणार आहेत. इतर लोकांनाही या रस्त्यावरून ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
एकूण १४ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे ७५ रस्ते आहेत. बंद करण्यात आलेले मार्ग- सांगली ग्रामीण- आष्टा ते दुधगाव, कुची ते माळवाडी. मिरज ग्रामीण- खटाव ते केंपवाड, लक्ष्मीवाडीते मंगसुळी, लक्ष्मीवाडी ते लोकूर, जानराववाडी ते मदभावी, जानराववाडी ते बुबनाळ, जानराववाडी ते परळहट्टी, नरवाड ते लोकूर. महात्मा गांधी चौकी- अर्जूनवाड ते कृष्णाघाट मिरज. विटा- भिकवडी ते मायणी, कलढोण, देवीखिंडी, वेजेगाव ते कलढोण, माहुली ते चितळी, चिखलहोळ ते चितळी.
आटपाडी- दिघंची ते पंढरपूर, मायणी, म्हसवड, आटपाडी ते कोळे, सांगोला. कडेगाव- बेंबाळेवाडी रोड, टेंभू कालवा रोड, चिंचणी वांगी- सोनसळ घाट. आष्टा- आष्टा ते शिगाव, शिराळा- बायपास रोड, आयटीआयसमोर. कासेगाव- मालखेड फाटा, दगडेमळा ते कासेगाव, बेलवडे बुद्रुक ते कासेगाव. कोकरुड - बिळाशी ते भेडसगाव, चरण ते सोंडोली, आराळा ते सित्तूर, सोनवडे ते ऊखुळ, पाचगणी ते बुरबुशी.
जत - शिंगणापूर, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, सिंदूर, उमराणी, खोजनवाडी, रावळगुंडवाडी, मुंचडी, सिद्धनाथ, सिंगनहळ्ळी, वायफळ, खैराव, निगडी मार्ग. कवठेमहांकाळ - नागज फाटा, अथणी ते लोणारवाडी, सलगरे, अनंतपूर, खिळेगाव, शिरूर ते सलगरे.
उमदी- चडचण रोड, सोनलगी ते देवनिंबर्गी, सुसलाद ते जिगजेनी, अक्कळवाडी ते कनकनाळ, गिरगाव ते हिंचगिरी, कोणबगी ते जालगिरी, कागनरी ते टक्कळगी, धुळकरवाडी ते धंदरगी, जालीहाळ खुर्द ते धंदरगी, लवंगा ते मडसनाळ, जाडर बोबलाद ते सलगरे.