सांगली : संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत.सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने अनेक खबरदारीचे उपाय केले आहेत. महापालिका क्षेत्रात किराणा, भाजीपाला, दूध घरपोच करण्याची व्यवस्था आहे. तरीही सकाळच्या टप्प्यात रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नाही. सकाळी दूध, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी नागरिक दुचाकीवरून घराबाहेर पडत आहेत.कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, पोलिसांनी आता सक्त कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी सोमवारी सायंकाळी, विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी सात ते नऊ या कालावधित पोलिसांनी विनाकारण रस्त्यावरून फिरणाºया २०० मोटारसायकली जप्त करून पोलीस ठाण्यात आणल्या. आता १४ एप्रिलपर्यंत या मोटारसायकली पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहेत.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं
CoronaVirus Lockdown : सांगलीत पोलिसांकडून दोनशेवर दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 3:58 PM
संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल २०० मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत.
ठळक मुद्देसांगलीत पोलिसांकडून दोनशेवर दुचाकी जप्त कारवाईमुळे दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले