सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीत होळीकट्टा, शनिवार पेठ मिरज या भागामध्ये दिनांक 12 मे रोजी कोविड 19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज येथील कंटेनमेंट झोन भागात भेट देऊन पाहणी केली व या भागात कंटेनमेंट आराखड्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा , महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस , उपविभागीय अधिकारी मिरज समीर शिंगटे, पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप गिल यांची प्रमुख उपस्थिती होती.कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या हालचालींचे काटेकोरपणे नियमन करण्यात येईल असे सांगून या भागात जीवनावश्यक वस्तू लोकांना घरपोच देण्यात येतील. त्यासाठी परिसरातील युवकांचे पथक तयार करावे, या पथकाने पाच फूट अंतरावरून लोकांना जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंची डिलेव्हरी द्यावी. आरोग्य पथकांद्वारे अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षण व्हावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम अत्यंत काटेकोरपणे करण्यात येत असून परिसराचे निर्जंतुकीकरण व्हावे व अन्य अनुषंगिक उपायोजना काटेकोरपणे राबवाव्यात अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिल्या.होळी कट्टा मिरज येथील कंटेनमेंट झोन परिसरातील 763 घरातील 3505 लोकांचे तर लोकांचे आठ वैद्यकीय पथकामार्फत तर बफर झोनमध्ये 540 घरातील 2429 लोकांचे ९ पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.या परिसरांमध्ये औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच कोरोणा रुग्णाच्या घरातील लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना संस्था क्वारंटाइन करण्यात आले आहे .वैद्यकीय पथकामार्फत सर्वे करून आय एल आय रुग्णांची व सारी रुग्णांची माहिती घेण्यात येऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी कंटेनमेंट व बफर झोन अधिसूचित करण्यात आले.कंटेनमेंट झोन महानगरपालिका क्षेत्रस्वामी गिफ्ट सेंटर, डॉ. भोसले हॉस्पिटल, मोमीन मज्जिद, बंडू भस्मे घर, केदार अपार्टमेंट, जैन बस्ती चौक, डॉ.विकास पाटील हॉस्पिटल, रावळ हॉस्पिटल, शनी मारुती मंदिर.बफर झोन महानगरपालिका क्षेत्रदिलीप मालदे घर चर्च रस्ता, परशुराम कलकुटकी घर, श्रीनिवास हॉस्पिटल, दुर्गा माता मंदिर, बसवेश्वर चौक, श्री कृपा बंगला, लक्ष्मी निवास, नागोबा कट्टा, शौकत शेख घर , पुणेकर हॉस्पिटल चौक, पाटील हौद चौक, मुरगेंद्र ढेरे घर कमान वेस रस्ता.