सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत 1) गुरूप्रसाद बंगला ते मनपा शाळा नंबर 14, 2) मनपा शाळा नंबर 14 ते सुशांत पाटील घर, 3) सुशांत पाटील घर ते शिवकृपा बंगला, 4) शिवकृपा बंगला ते बाळू पाटील घर 5) बाळू पाटील घर ते बिरोबा मंदीर 6) बिरोबा मंदीर ते सिध्दनाथ बंगला 7) सिध्दनाथ बंगला ते आई बंगला, 8) आई बंगला ते केंगार घर 9) केंगार घर ते शिवगर्जना चौक 10) शिवगर्जना चौक ते गुरूप्रसाद बंगला, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.बफर झोन पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोनच्या स्थलसीमा हद्दीबाहेर व उर्वरित महानगरपालिका स्थलसीमा हद्द 1) लकी टायर्स ते पॉप्युलर बेकरी 2) पॉप्युलर बेकरी ते शांती निकेतन 3) शांती निकेतन ते अमन फर्निचर 4) अमन फर्निचर ते आरती बंगला 5) आरती बंगला ते रावसाहेब मोकाशी घर 6) रावसाहेब मोकाशी घर ते लकी टायर्स.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.0