शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:39 PM

कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्तअवैध व भेसळयुक्त मद्यविक्री होत असल्यास माहिती द्या

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच मुंबई दारूबंदी कायदा 1949 अन्वये मंजूर असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगली जिल्ह्यात 23 मार्च ते 19 एप्रिल 2020 या कालावधीमध्ये एकूण 83 गुन्हे नोंद करून 54 आरोपींना अटक करून 13 वाहनांसह एकूण 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबत आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करून चोरट्या पध्दतीने बेकायदेशीरपणे मद्यविक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती सुरू ठेवल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये हॉटेल वैभव मिरज, हॉटेल रायगड शेगांव ता. जत व शिवतेज बिअर शॉपी या मद्यविक्री अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे अधीक्षक किर्ती शेडगे यांनी सांगितले.लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच भेसळयुक्त मद्यविक्री, हातभट्टी विक्री तसेच मद्याचा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदी