शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

CoronaVirus Lockdown : आॅनलाईनपेक्षा दुकानातील खरेदीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:45 AM

जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सराफ व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असला तरी, ग्राहकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. एकल दुकाने सुरू होताच खरेदीसाठी गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. आता सराफ पेठा सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविवाह सोहळे, गुंतवणुकीसाठी वाढजिल्ह्यातील व्यावसायिकांना दिलासा

अविनाश कोळी सांगली : जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ खंडानंतर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सराफ व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असला तरी, ग्राहकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. एकल दुकाने सुरू होताच खरेदीसाठी गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. आता सराफ पेठा सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात ज्वेलर्सची दुकाने दोन महिने बंद असल्याने सुमारे दीडशे कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडव्याचा मुहूर्त निघून गेला. अक्षय तृतीयेपासून काही मोठ्या ज्वेलर्सनी आॅनलाईन सोने व दागिन्यांच्या विक्रीची सोय केली होती. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला, मात्र बहुतांशी सोने खरेदी गुंतवणुकीसाठी होती.

आॅनलाईन दागिने खरेदीचे प्रमाण कमीच होते. दुकानात जाऊन हाताळून, निरीक्षण करून खरेदी करण्याची ग्राहकांना सवय आहे. त्यामुळे एकल दुकाने सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी झाली. ग्रामीण भागातही तसाच प्रतिसाद मिळाला.

शहरातील सराफ पेठा बंद असल्यामुळे त्या सुरू होण्याची ग्राहकांना आणि व्यावसायिकांना प्रतीक्षा होती. जिल्हा प्रशासनाने सम-विषम तारखेनुसार पेठा सुरू करण्यास परवानगी दिल्याने हा व्यवसाय आता पूर्वपदावर येणार आहे.सांगली शहरात गेले पंधरा दिवस मोजकीच चार-पाच दुकाने सुरू होती. तेथे दागिन्यांच्या खरेदीसाठी किंवा जुने दागिने देऊन नवे घेण्यासाठी गर्दी दिसत होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह होत असले तरी, ते दागिन्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत.

काहींनी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून शुद्ध दागिन्यांची आॅनलाईन व प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी सुरू केली आहे. बंद असलेल्या काही दुकानांनी आॅनलाईन खरेदी प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकांना दुकाने उघडल्यानंतर डिलिव्हरी देण्याचे नियोजन केले आहे. सध्या घरपोहोच डिलिव्हरीची सोय नाही. त्यामुळे खरेदीसाठी लोकांना प्रत्यक्ष दुकानात जावे लागत आहे.हॉलमार्कच्या नियमांची चिंतासध्या हॉलमार्कच्या नियमांचे पालन करताना अडचणी येत आहेत. यातच बीआयएस मानांकनात १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा अधिक आहे. तो १५ जानेवारी २०२१ पर्यंत संपविण्याची मुदत आहे. तरीही हॉलमार्कच्या अन्य अनेक नियमांचे अडथळे या व्यवसायात येत आहेत.दागिन्यांसाठी आजही दुकानेच पहिली पसंतीजिल्ह्यातील बहुतांश सराफ दुकाने बाजारपेठांमध्ये आहेत. एकल दुकानांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही मोजकीच दुकाने सुरू होती. अद्याप आपल्याकडे आॅनलाईन दागिने खरेदीला पसंती मिळत नाही.

प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिने हाताळून ते खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. केवळ शुद्ध सोने खरेदी करायचे असेल तर आॅनलाईनचा पर्याय चांगला आहे. मात्र दागिन्यांसाठी आजही दुकानेच ग्राहकांची पहिली पसंती आहेत.- किशोर पंडित,उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ, सुवर्णकार फेडरेशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीGoldसोनं