सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यार्या १८० लोकावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या लोकांच्याकडून महापालिकेने २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे समोर आले आहे.
वारंवार सूचना देऊनही नियमाचे उल्लंघन होत होते. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी नियमांचे पालन न करणार्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभाला दिले होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर युनुस बारगीर यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने 26 ते 28 मे दरम्यान सांगली मिरज आणि कुपवाड या तीन शहरात 180 लोकांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
यात मास्क न वापरल्याबद्दल 151 व्यक्तींच्याकडून १५ हजार 100, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या बावीस व्यक्तींकडून 11500, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी सात व्यक्तींकडून सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.