शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: कोल्हापुरातील कोरोना चाचणी नमुने पुन्हा मिरजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:09 AM

प्रयोगशाळेत त्रुटीमुळे तेथील कोरोना संशयितांचे नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नमुन्यांची संख्या वाढल्याने मिरजेतील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे.

मिरज : कोल्हापुरात कोरोना तपासणी प्रयोगशाळेत त्रुटीमुळे तेथील कोरोना संशयितांचे नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नमुन्यांची संख्या वाढल्याने मिरजेतील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. मिरजेत १ एप्रिलपासून प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर चार जिल्ह्यातील सुमारे २४०० नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. कोल्हापुरात संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळा सुरू झाल्याने सोमवारपासून मिरज सिव्हिलमध्ये प्रयोगशाळेत कोल्हापुरातील नमुने पाठविणे बंद करण्यात आले. मात्र कोल्हापुरातील प्रयोगशाळेत तपासणी अहवालात त्रुटी आढळल्याने दोनच दिवसांत नमुने पुन्हा मिरजेला पाठविण्यात येत आहेत. गुरुवारी कोल्हापुरातून आलेले नमुने मिरजेतील प्रयोगशाळेत स्वीकारण्यास नकार देण्यात आला. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने नमुने स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळाली.कोल्हापुरात तपासणीची सोय झाल्याने मिरजेत तीन जिल्ह्यांतील नमुने तपासणीसाठी येत असल्याने प्रलंबित राहणाऱ्या नमुन्यांची संख्या कमी झाली होती; मात्र कोल्हापुरातील प्रयोगशाळेतील तपासणी पद्धतीतील त्रुटी दूर होईपर्यंत तेथील नमुन्यांची मिरजेतच तपासणी होणार आहे. मिरजेतील प्रयोगशाळेत दररोज सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे दररोज दोनशे नमुने तपासणीसाठी येतात. यापैकी ४० टक्के नमुन्यांची तपासणी प्रलंबित रहात आहे. प्रयोगशाळेत तपासणी करणाºया ‘रियल टाईम पीसीआर’ या उपकरणासाठी रसायनांचे मिश्रण करणारे स्वयंचलित उपकरण नसल्याने व पुरेसे तपासणी कीटस् उपलब्ध होत नसल्याने तपासणीची गती संथ आहे. तपासणी क्षमता कमी असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे.

कोल्हापुरात चाचणी किटची टंचाईकोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. कोल्हापूर व मिरजेत तपासणी प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या एकाच नमुन्याचा अहवाल दोन्हीकडे वेगवेगळा आल्याचा प्रकार घडला. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी मिरजेतील प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेतले आहे. कोल्हापूर प्रयोगशाळेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येत असल्याची माहिती मिळाली; मात्र कोल्हापुरात चाचणी किटची टंचाई असल्याने नमुने पुन्हा मिरजेत येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस