ठळक मुद्देसांगली शहरात महापालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत.
सांगली: सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोनाचे निदान झाले होते.
सांगली शहरात महापालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. यात गुरुवारी शहरातील पोलिसांची चाचणी करण्यात आली यात पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक पोलिसांचा अहवाल आला आहे. यासह आटपाडी येथील पोलिसांनाही कोरोना निदान झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा