सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत व आधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचीही चाचणी सुरू असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्या झालेल्या रुग्णातील प्लाझ्मा संकलनासाठी सर्वत्र प्लाझ्मा बॅँक स्थापण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देशमुख म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने कोरोनावर अत्याधुनिक उपचारपध्दतीचा अवलंब करण्यात येत असून जगभरात प्रभावी ठरलेल्या प्लाझ्मा थेरपीच्याही चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित अत्यवस्थ रूग्णांवर या पध्दतीने उपचार प्रभावी ठरतो. त्यामुळे सर्वत्र प्लाझ्मा बॅँक तयार करण्यात येणार आहेत. बºया झालेल्या रुग्णाच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीनेच ही व्यवस्था करण्यात येणार आहे.सांगली जिल्ह्यातही सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलीतरी त्यानंतरची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या उपाययोजनांची सर्वात प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रूग्णदर व मृत्यूदर कमी आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ५० वर्षावरील सर्वांची यादी तयार असल्याने कोरोना नियंत्रणासाठी मदत होणार आहे.नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयातही सुरक्षाविषयक पीपीई किटसह इतर साधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नॉन कोविड रुग्णांवर उपचारात अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात अस्वस्थता असते. ती दूर करण्यासाठी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी व्हिडीओ कॉलव्दारे संवाद साधण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकालाही दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
नॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावेनॉन कोविड रुग्णांच्या सोयीसाठीही प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयातही सुरक्षाविषयक पीपीई किटसह इतर साधणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नॉन कोविड रुग्णांवर उपचारात अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.