शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

CoronaVirus: हृदयद्रावक...! मनाला सुन्न करणारी घटना...! तेरा तासांत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:25 AM

तेरा तासांत बघताबघता एक कुटुंब संपले. सचिनचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते दोघे पती-पत्नी मुंबईत रहात होते.

शिराळा (सांगली) - संपूर्ण राज्यातच कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यातच शिराळा तालुक्यातील शिरशी येथे हृदयद्रावक आणि मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे बघताबघता केवळ तेरा तासांत कोरोनाने पती, पत्नी आणि मुलाचा बळी घेतला. पती-पत्नीचा १२ तासांत, तर एक तासानंतर मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (CoronaVirus: In thirteen hours three members of the same family died due to corona Virus)

कोरोनाची लागण झालेले सहदेव विठ्ठल झिमुर ( वय ७५) हे गेल्या २२ दिवसांपासून खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. त्यांची पत्नी सुशीला ( वय ६६) तसेच त्यांचा मुलगा सचिन ( वय ३०) यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सचिन हा मुंबई येथे एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो लॉकडाऊन मुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वीच शिरशी येथे आला होता.

कोरोनावर रेमडेसीवीर औषध प्रभावी नाही, उपचारातून लवकरच हटविण्याची शक्यता

सहदेव झिमुर हे प्रकृती ठीक झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच शिरशी येथे घरी आले होते. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवार (दि.१८) पहाटे ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शिरशी येथे आणण्यात आला. त्यांच्यावर त्यांचा पुतण्या रोहित याने अंत्यसंस्कार केले. सहदेव यांचा मृत्यू होऊन बारा तास होतात न होतात तोच सायंकाळी पाच वाजता पत्नी सुशीला यांचेही निधन झाले. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असतानाच एक तासात म्हणजे सायंकाळी सहा वाजता मुलगा सचिन याचाही मृत्यू झाला.

तेरा तासांत बघताबघता एक कुटुंब संपले. सचिनचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते दोघे पती-पत्नी मुंबईत रहात होते. लॉक डाऊनमध्ये अडकल्याने हे दोघे शिरशीत होते. सचिन यास दोन विवाहित बहिणी आहेत. 

मृत सहदेव, सुशीला व सचिन हे प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्या आशा झिमुर, मनस्वी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय झिमुर यांचे काका, काकी आणि चुलत भाऊ होते.

Coronavirus: पहिल्यांदाच देशात ४ लाखांहून अधिक काेराेना रुग्ण बरे; ४,२२,४३६ रुग्ण एकाच दिवसात बरे

शिरशी येथील अत्यंत दुर्दैवी घटना -मृत व्यक्तींच्या घरचे कुणीही जवळचे नातलग नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी शिराळा नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत पार पाडण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील, लक्ष्मण मलमे, संजय इंगवले, विजय शिंदे, मुनीर लंगरदार, अल्ली मुंडे, रमेश जाधव, संतोष कांबळे, सागर दाभाडे, अमोल जाधव, सचिन कांबळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रात्री २:३० वाजता दहन देऊन हे सर्वजण परत आले.

- तहसीलदार गणेश शिंदे यांना या घटनेची माहिती होताच त्यांनी तातडीने मुख्याधिकारी पाटील यांना कळवून अंत्यसंस्कार करण्या बाबत सहकार्य करण्यास सांगितले.

- प्रहार संघटनेचे श्रीराम नांगरे यांनी आपल्या रुग्णवाहिकेमधून तिघा मृत व्यक्तींचे मृतदेह शिरशी येथे नेले तसेच अंत्यसंस्कार करण्यासही मदत केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीkolhapurकोल्हापूर