शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Coronavirus Unlock : कशी सुरू होणार शाळा आणि महाविद्यालये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 4:51 PM

शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हाभरातून विद्यार्थी, शिक्षक येणार असून तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकशी सुरू होणार शाळा आणि महाविद्यालये? प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती

सांगली : राज्य शासनाने नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग दि. १ जुलैपासून सुरू करण्याची परवानगी देऊन पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी शालेय समित्यांवर टाकली आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हाभरातून विद्यार्थी, शिक्षक येणार असून तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सॅनिटायझर, स्वच्छतेबाबत शालेय समित्या, संस्थापकांनी मौन पाळले आहे. यामुळे शाळेत येण्याबाबत शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे.कोरोनाची रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आहे. गंभीर परिस्थिती असताना शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासन आणि विद्यापीठाने ताठर भूमिका घेणे चुकीचे आहे, असग शिक्षक संघटनांचे मत आहे. राज्यात एकाही विद्यापीठाने महाविद्यालये चालू करण्याची भूमिका घेतलेली नाही. केवळ शिवाजी विद्यापीठाने सर्वच प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे.

काही महाविद्यालयांमध्ये अध्यापकवर्ग शंभरावर आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाचा प्रश्न आहे. स्टाफरुमही छोट्या आहेत. स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छता नाही. सॅनिटयझर, हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता नाही.

प्राध्यापक, विद्यार्थी अनेक गावांमधून महाविद्यालयात येणार आहेत. यापैकी एखादा जर पॉझिटिव्ह असेल तर किती व्यक्तींना त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे, यासह अनेक प्रश्न प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये उपस्थित होत आहेत.

हीच परिस्थिती माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्येही आहे. येथील शिक्षकांनीही कोरोनाची भीती संपेपर्यंत शाळा सुरू करू नयेत, अशीच भूमिका घेतली आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांनीही शासनाकडे दि. १ नोव्हेंबरपासूनच शाळा सुरू करावी, सॅनिटायझर आणि अन्य सुविधांसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रSangliसांगली