सांगली : शहरातील विजयनगर येथील एक रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आल्याने सदरचा परिसर सील करण्यात आला आहे. यामध्ये मिरजकडून येताना भारती हॉस्पिटल, विश्रामबाग चौक, विजय नगर रेल्वे ब्रिज, मराठा समाज कृष्णाली वसाहत, जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
विजय नगर पर्ल हॉटेलच्या मागील बाजूस सदर व्यक्तीचा रहिवास असल्याने विजय नगर परिसरातील प्रत्येक गल्ली बॅरिकेड्स लावून सील करण्यात आली आहे. याठिकाणी 51 ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. सांगलीतून मिरज कडे जाण्यासाठी कुपवाड मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये.असे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण परिसरामध्ये 3 शिफ्टमध्ये पोलिस बंदोबस्त 24तास तैनात ठेवण्यात आला आहे. जो परिसर सील केला आहे त्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आल्या आहेत. या परिसरामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या विविध पथकांमार्फत सर्वे सुरू करण्यात आला आहे . , संपूर्ण सांगली शहर , मिरज या ठिकाणच्या लोकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहनपोलिस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी केले आहे.