मिरज : महापालिकेवर दगडफेक व शिक्षेच्या कारणावरुन नगरसेवक पद अपात्र ठरविण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर सुरेश आवटी व मैनुद्दीन बागवान यांच्या अपिलाबाबत २९ जून रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान निकालास स्थगिती व महापालिका कामकाजात भाग घेण्याच्या मागणीबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. महापालिकेवर मोर्चा काढून दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याने जिल्हा न्यायालयाने सुरेश आवटी व मैनुद्दीन बागवान यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णय दिला आहे. या निर्णयास आवटी व बागवान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती व महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देण्याची मागणी आवटी व बागवान यांनी न्यायालयाकडे केली. मात्र या मागणीवर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता दि. २९ जून रोजी पुढील तारीख दिली. (वार्ताहर)पुन्हा संघर्षमिरजेतील प्रभाग ३० मध्ये उमेदवाराच्या पात्रतेबाबतच्या तक्रारीमुळे पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा न्यायालयीन संघर्षाची शक्यता आहे. बेकायदा बांधकाम केल्याने व जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने काँगे्रस उमेदवाराला अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.
नगरसेवक पद अपात्रता; २९ रोजी होणार सुनावणी
By admin | Published: April 21, 2016 11:57 PM