शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कॉटन मिल, रेल्वे बंदचा गावाला फटका

By admin | Published: June 22, 2016 11:27 PM

विकास ठप्प होण्याची पूर्वसूचना : वैभव लोप पावू लागले, उद्योग-व्यवसायाला बसली खीळ -- बदलते माधवनगर२

गजानन साळुंखे - माधवनगर  विविध अंगांनी विकसित होत गेले. आर्थिक सुबत्ता आली. अनेकांच्या हाताला काम मिळाले. कामगार चळवळींमुळे घडामोडी वाढल्या. गावाचे ‘ग्रामीण’पण संपत जाऊन नागरीकरणाचा खुणा दिसू लागल्या होत्या. त्याचवेळी सत्तरच्या दशकात माधवनगर रेल्वे बंद झाल्याने गावाला पहिला दणका बसला. माधवनगर रेल्वे स्थानक बंद होऊन गावातील मार्ग बाहेरून गेला. त्यापाठोपाठ गावाचे वैभवही लोप पावू लागले. गावाचा विकास ठप्प होण्याची ही पूर्वसूचना होती.माधवनगर रेल्वे स्थानकामुळे गावात वर्दळ होती. छोटे-मोठे व्यवसाय टिकून होते. मिलसाठी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक होत होती. त्यामुळे माधवनगर व आसपासच्या गावांना फायदा होत होता, पण स्थानक बंद झाल्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले. नव्वदच्या काळात गावाला कॉटन मिलमधील संघर्षाचा फटका जाणवू लागला. कामगार संघटना आणि मिल मालक यांच्यात खटके उडू लागले. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर झाला. कामगार संघटनांमुळे डाव्या विचारसरणीचा वावर होताच. त्याचबरोबर कॉँग्रेस, जनसंघही प्रभाव राखून होते. १९९०-९१ पासून मिलमधील संघर्षने उग्र रूप धारण केले, त्याचा परिणाम सप्टेंबर १९९४ दि माधवनगर कॉटन मिल बंद होण्यावर झाला. कॉटन मिलची चिमणी विझली आणि कामगारांच्या जीवनात अंधार पसरला. मिल सुरू होण्यासाठी विविध पातळीवर व्यापक प्रयत्न झाले.या काळात गावात सातत्याने मोर्चा, बैठका होत. कामगार एकजुटीच्या घोषणा दिल्या जात. पण त्याला यश आले नाही. मिल अखेर कायमची बंद पडली. तिच्यामुळे कामगार उघड्यावर पडलाच पण गावाचा विकासही ठप्प झाला. त्यावर अवलंबून असणारे इतर उद्योगही बंद पडू लागले. बेरोजगारांची संख्या वाढत होती. गावाला बकाल अवस्था आली. मिल पुन्हा सुरू होण्यासाठी लढणारे कामगार शेवटी देणी मिळण्यासाठी झगडू लागले. बॅँका व वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगारांचे थकित पगार, फंड वाढत होते. मात्र मिल कायमची बंद झाल्याने हे पैसे मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले.दि. २२ आॅगस्ट २००३ ला मिलचा लिलाव झाला. कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावाने विकली गेली. पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष रस्त्यावरून न्यायालयात गेला होता. ग्रामस्थांची व कामगारांची एक पिढी या कालावधीत खर्ची पडली. गावाची आर्थिक प्रगती थंडावली. यंत्रमाग बंद पडू लागले, त्याची जागा ‘आॅटोलूम’ने घेतली. पुन्हा कामगार कपात सुरू झाली. व्यावसायिक मंदीचाही परिणाम कापड उद्योगावर झाला. कामगारांनी संसारोपयोगी वस्तू विकून घर चालवले. याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला. मिलमुळे मोठा महसूल बंद झाल्याने आणि उद्योग-व्यवसायही ठप्प झाल्याने ग्रामपंचायत दुबळी बनली. अनेक विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडून मजुरी करू लागले. या दरम्यान गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उग्र रूप धारण करू लागला. कुपवाड औद्योगिक वसाहत व तत्कालीन सांगली नगरपालिका येथे पाणीपुरवठा करत होती. मिलमुळे येणाऱ्या महसुलातून ग्रामपंचायत पाणीपट्टी भरू शकत होती, पण गावाची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने कोट्यवधीची पाणीपट्टी थकली. त्यावेळी सहा हजार लोकसंख्या असणारे, पण पाणीपट्टीचे दोन कोटी थकबाकी असणारे गाव अशी वेगळी ओळख माधवनगरची होती! मिलमुळे गावात कामासाठी आलेल्या लोकांच्या राहण्याची समस्याही निर्माण झाली होती. या आखीव व रेखीव गावात निवाऱ्याची समस्या उद्भवली. रेल्वे बंद झाल्याने गावात मोकळी जागा झाली. त्यावर छोट्या-छोट्या झोपड्या उभ्या राहू लागल्या.अहिल्यानगर, राजगुरुनगर, अवचितनगर अशा मोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. बंद पडलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपड्या गावाचाच भाग बनल्या. त्यापैकी अवचितनगर, गांधीनगर, कर्नाळरस्ता झोपडपट्टी शासनाने नियमित केली, पण बाकीच्या ठिकाणांचा प्रश्न बिकट आहे. (क्रमश:)