शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

सांगली लोकसभेची १४ टेबलावर मतमोजणी, दुपारपर्यंत होणार निकालाचे चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:17 IST

मतमोजणीच्या २० ते २५ फेऱ्या होणार, हाती उरले अवघे १४ दिवस..

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जूनला वेअर हौसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे १४ टेबलांवर होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या २० ते २५ फेऱ्या होणार आहेत. पलूस-कडेगाव, जत विधानसभेच्या २० तर सर्वाधिक खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, डॉ. विकास खरात, राजीव शिंदे, सविता लष्करे, डॉ. स्नेहल कनीचे आदी उपस्थित होते.

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या दिवशी १८ लाख ६८ हजार १७४ मतदारांपैकी ११ लाख ६३ हजार ३५३ मतदारांनी ‘इव्हीएम’वर आपले मत नोंदवले आहे. एकूण ६२.२७ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, याचे चित्र दि. ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, वेअर हाैसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉगरूममध्ये ईव्हिएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत. दि. ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ७ वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्राँगरूम उघडण्यात येणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतमोजणी २२ फेरीत, सांगली विधानसभा मतदारसंघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतमोजणी २२ फेरीत, पलूस-कडेगाव मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतमोजणी २० फेरीत, खानापूर विधानसभा मतदारसंघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतमोजणी २५ फेरीत, तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील २९९ मतदान केंद्रावरील मतमोजणी २१ फेरीत आणि जत विधानसभा मतदारसंघातील २८१ मतदान केंद्रावरील मतमोजणी २० फेरीत होणार आहे.

अशी असेल संरचनालोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. याअनुषंगाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी ही प्रत्येकी १४ टेबलांवरून होणार आहे. त्यानुसार एकूण ८४ टेबल असतील. तसेच टपाली व इतर मतांच्या मोजणीसाठी एकूण २० टेबलांवरून होणार आहे.

‘त्या’ मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल..यावेळी निवडणूक आयोगाने ८५ वर्षे वयावरील व दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रत्येकवेळी जशी टपाली मतांची मोजणी स्वतंत्र टेबलवरून होते, तशीच या मतांचीही मोजणी स्वतंत्र २० टेबलवरून होणार आहे.

हाती उरले अवघे १४ दिवस..आजपासून १४ व्या दिवशी सांगली लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण?, याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मनुष्यबळाबाबतचा फॉरमॅट पाठविला असून, त्यांना कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Result Dayपरिणाम दिवस