वांगी (ता. कडेगांव) येथील आयुर केअर आयुर्वेदिक शॉपच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, डॉ. सचिन जिरगे, ‘सोनहिरा’चे संचालक दिलीप सूर्यवंशी, ‘कृष्णा’चे संचालक ब्रिजराज मोहिते, रवींद्र कांबळे, डॉ. योगेश महामुनी, डॉ. विजय होनमाने उपस्थित होते.
शरद लाड म्हणाले, भारतात मधुमेह, उच्च रक्तदाबाचा विळखा घट होत चालला आहे. यावर केमिकल उपचारामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते. भारतात भविष्यात आयुर्वेदिक औषधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असून भारत हा आयुर्वेदिक औषधांचा निर्यातीचा जगात एकमेव देश असणार आहे. यावेळी माजी सरपंच शशिकांत माळी, बाबासो सूर्यवंशी, सुनील देशमुख, राहुल साळुंखे, धनाजी सूर्यवंशी, नाथाजी मोहिते, रमेश एडके, दीपक सूर्यवंशी, दत्ताजी चव्हाण, बाळासो वत्रे, गोरख कांबळे, उत्तम तांदळे, तुषार कंडरे, वसंत मोहिते, मोहन यादव, जोतिराम होलमुखे उपस्थित होते. अमोल मोहिते यांनी स्वागत केले, तर मोहन मोहिते यांनी आभार मानले.