सांगली - शेतजमिनीबाबत झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी करोली (एम) ता. मिरज येथील मनोहर राघू घोडके व शालन मनोहर घोडके या दापंत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तास असणा-या पोलीस कर्मचा-यांने प्रसंगावधान राखत घोडके यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक घडलेल्या प्रकाराने कार्यालयात धावपळ उडाली होती.कार्यालयाच्या पायºयाजवळच हा प्रकार झाला. मात्र, पोलीस कर्मचा-याचे वेळीच या प्रकाराकडे लक्ष गेल्याने त्याने घोडके यांच्याकडून काडेपेटी काढून घेत त्यांना समाजवण्याचा प्रयत्न केला. मनोहर घोडके यांनी सांगितले की, ते कुटुंबासह करोली एम येथे राहण्यास आहे. गावच्या हद्दीतच घोडके यांची जमिन आहे. नंदकुमार घोडके यांनी मिरज तहसिलदार यांना चुकीची माहीती देत ३० मे २०१७ रोजी सात बाराला मनोहर घोडके यांची नावे कमी करून आपले नाव लावून घेतले आहे. त्यानंतर ही जमिन सुनिल पाटील व अन्य लोकांच्या नावावर खरेदी पत्र करून विकली आहे. सातबाराला आपले नाव कमी करताना आपल्याला कोणतीही नोटीस न देता, माहीती न देता उद्योग करण्यात आला आहे. याबाबत घोडके यांनी मिरज न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. दरम्यानच्या काळात नंदकुमार घोडके यांनी आमच्या मालकीची ही जमिन आमच्या परस्पर गावातील सुनिल सुदाम पाटील व अन्य लोकांना विकली असल्याची तक्रार मनोहर घोडके यांंनी मिरज ग्रामीण पोलिस व अन्य आवश्यक ठिकाणी दिली आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याची घोडके दाम्पत्यांची तक्रार आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले असल्याची सांगितले. दाम्पत्यांवर गुन्हा?कोणतीही पूर्वसूचना न देता घोडके दाम्पत्याने अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात येत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने विश्रामबाग पोलीसांचे एक पथक कार्यालयात दाखल झाले व त्यांनी दोघांना समजावून सांगत शांत केले. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना ठाण्यात नेण्यात आले. आत्मदहनाबद्दल दांम्पत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दाम्पत्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 7:29 PM