शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून भावाचा खून, आरोपी अटकेत; सांगलीतील बेडगमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:48 AM

खुनाच्या घटनेने सांगली जिल्हा हादरुन गेला

सांगली : बेडग (ता. मिरज) येथे बंडू शंकर खरात (वय ५०) या शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी (दि. १९) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. खुनानंतर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती येथे घटना घडली. जमिनीच्या वादातून खून झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घालण्यात आले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना प्रतिकाराची संधीही संशयिताने दिली नाही. सपासप वार करून खून करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. खुनासाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली.खरात यांचा जमिनीच्या वादातून एकाशी वाद सुरू होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले.मृत खरात यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात रात्री नेण्यात आला. घटनास्थळी मिरज ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. चव्हाण हजर झाले होते. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व अन्य प्रक्रिया सुरू होती.

गावात महिन्यात दुसरा खूनबेडगमध्ये एकापाठोपाठ एक खुनाचे प्रकार घडत आहेत. एका महिन्यातच आजचा दुसरा असा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारल्याची घटना नुकतीच घडली होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस