यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, आप्पाराया बिराजदार, सरपंच निवृत्ती शिंदे, बाबासाहेब कोडग, बाळ निकम, निवृत्ती शिंदे, वहाब मुल्ला, डॉ. गजानन गुरव व डॉ. सुशांत बुरकुले उपस्थित होते.
आमदार सावंत म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार करणे हे महत्त्वाचे आहे. कोरोना आजाराला घाबरून जाण्याचे काही कारण नाही. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. शासनाने दिलेले नियम पाळले तर या रोगावर निश्चितच मात करता येते.
चौकट
प्रयत्न यशस्वी
उमदी येथे खासगी डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेत अन्य डॉक्टरांसह कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. आमदार सावंत यांनी होकार देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कोविड सेंटर उभारल्याने डॉ. राहुल पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांचे उमदी परिसरातून कौतुक होत आहे.