फोटो: खानापूर येथे मातोश्री कोविड सेंटरचे उद्घाटन आ. अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, प्रांत संतोष भोर, सुहास शिंदे, डॉ. उदयसिंह हजारे उपस्थित होते.
खानापूर : खानापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे व डॉ. उदयसिंह हजारे यांच्या प्रयत्नातून मातोश्री मंगल कार्यालयामध्ये सामाजिक बांधिलकी जपत कोविड रुग्णांच्या सेवेसाठी मातोश्री कोरोना सेंटरच सुरू करण्यात आले.
आ. अनिल बाबर यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
गतवर्षी सुहास शिंदे व डॉ. उदयसिंह हजारे यांनी हेच कोविड सेंटर सुरू केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्याने रुग्णसंख्या पूर्णपणे घटली होती. त्यामुळे कोविड सेंटर बंद करण्यात आले; परंतु आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत, औषधी उपलब्ध नाहीत. रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत. याची दखल घेत खानापुरात पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
या सेंटरमध्ये डॉ. उदय हजारे, डॉ. प्रशांत ताड, डॉ. नेहा हजारे, डॉ. हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले आहेत. कोविड सेंटर उद्घाटनावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सुहास शिंदे, डॉ. उदय हजारे, नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, राजेंद्र शिंदे, महेश माने, रायसिंग मंडले, उमेश धेंडे, राजेंद्र टिंगरे, शहाजी भगत आदी उपस्थित होते.