शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

नरसिंहगावच्या बारशामध्ये दिसला ऐक्याचा पाळणा! : संजयकाका-घोरपडे एकत्र येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:26 PM

कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात रंगली चर्चा तालुक्यातील लांडगेवाडी गावाचे नाव बदलून ‘नरसिंहगाव’ असे करण्यात आले. हा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा नेत्यांची गट्टी जमवण्याचा प्रयत्न केला असून, कार्यक्रमात दोघांच्या ऐक्याचा पाळणा हलल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर नरसिंहगाव वसले आहे. साधारण ४६० कुटुंबे आणि २१२५ एवढी लोकसंख्या असलेले हे गाव. १९८६ पासून लांडगेवाडी हे नाव बदलण्यासाठी येथील सर्वच लोक धडपडत होते. अखेर या लढ्याला यावर्षी यश आले आणि गावचे बारसे घालण्याचा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी राजकारण न आणता सर्वच नेत्यांना निमंत्रण दिले. भाजपचे खासदार पाटील, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील, खासदार गटापासून दुरावलेले अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या व महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे ही सगळीच मंडळी येणार म्हटल्यावर तालुक्यात चर्चेला उधाण आले.

नरसिंहगावच्या गावकºयांनी या गावच्या बारशाच्या सोहळ्याला सर्व माहेरवाशिणी, पै-पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना आवर्जून बोलावले होते. गावात सर्व मार्गांवर रांगोळी रेखाटली होती, गुढ्या उभारल्या होत्या. विद्युतरोषणाई करण्यात आली होती. कारण आजवरचे ‘वाडीकर’ आता ‘गावकरी’ होणार होते. याचा आनंद सर्वांच्याच चेहºयावर ओसंडून वाहत होता. सोहळा सुरू झाला.

सुरुवातीला घोरपडे यांचे आगमन झाले. ग्रामस्थांनी त्यांचे फटाके फोडून, वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात खा. संजयकाका पाटील कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आ. सुमनताई पाटील, मात्र तालुक्यात चर्चेला उधाण नको म्हणून दुपारीच गावात येऊन गावकºयांची भेट घेऊन गेल्या.

सोहळा सुरू झाला, खा. पाटील, घोरपडे यांचा सत्कार झाला. दोघांनीही नरसिंहगावच्या नामकरण कोनशिलेचे अनावरण केले. दोघांच्याहस्ते गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील हे घोरपडे यांना, ‘सरकार, या पुढे, घ्या, करा सत्कार’, असे म्हणत होते. गावचे उपसरपंच अरुण भोसले, प्रशांत कदम, बाळासाहेब कदम, एल. पी. कदम यांनी या दोघांनी भविष्यात एकत्र यावे, यासाठी भाषणातून जणू राजकीय मनोमीलनाचा पाळणाच म्हटला. हे सर्व घडताना अनिता सगरे साक्षीला होत्या.

अखेर कार्यक्रम पार पडला. गावात चूल बंद करण्यात आली होती. बारशाच्या जेवणाचा गावकरी, पाहुणे मंडळींसह सर्वांनीच आस्वाद घेतला. नरसिंहगावच्या बारशाच्या कार्यक्रमानिमित्त खा. पाटील आणि घोरपडे चार वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते आणि एवढ्या दिवसांचा अबोला या आनंद सोहळ्यावेळी सुटल्याचे चित्र होते. दोघांच्या जवळीकतेने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.मनोमीलनाकडे लक्षनरसिंहगावच्या बारशाने अजितराव घोरपडे व खा. संजयकाका पाटील यांच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांत या दोघांचे राजकीय मनोमीलन झाले, तर नवल वाटायला नको. राजकारणात सगळे काही माफ असते, असे आता लोक म्हणत आहेत.‘राजकीय बाळ’ रडू लागले!अलीकडे खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे-सरकार या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या सोहळ्याने मात्र तालुक्यातील राजकारणात उलटापालट होणार की काय, अशी चर्चा आता रंगली आहे. सोहळा पार पडला, नरसिंहगाव नामकरणही झाले, दोघांच्या राजकीय एकीचा पाळणाही हलला, पण या पाळण्यात भविष्यातील लोकसभा आणि विधानसभेचे ‘राजकीय बाळ’ रडू लागले आहे, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण