सांगली : छतावरील पाऊस पाणी संकलन व विहिर, विंधन विहीर पुनर्भरन या विषयांवरती दोन सत्रांमध्ये वेबिनार दि. 29 मे 2021 आयोजित करण्यात आला होता. रोजी त्यामध्ये catch the rain where it falls when it falls या ब्रीद वाक्यान्वये राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा असे आवाहन भूजल विभागाचे राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा पर्जन्य-छायेच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे जास्तीत-जास्त साठवण व पुनर्भरण करणेची गरज आहे. त्या नुसार सांगली जिल्ह्यामध्ये भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना वैयक्तिक, शासकीय, संस्थात्मक स्तरावर राबवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यावेळीछतावरील पाऊस पाणी संकलन आणि विहिर व बोअरवेल यांच्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करण्यसाठीच्या पध्दतींची ओळख करुन देण्यात आली. तसेच येत्या मान्सून काळात पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब शास्त्रोक्त पध्दतीने साठविण्याचे आणि मुरवण्याचे आवाहन करण्यात आले.पावसाच्या पाण्याचे भूजल पुनर्भरण नैसर्गिकरीत्या होते. परंतु वाढत्या भूजल उपशाचे प्रमाण पाहता पावसाच्या पाण्याचे मोठ्याप्रमाणावर कृत्रिम पद्धतीने पुनर्भरण करणे ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील ३८ पैकी १६ पाणलोटातील भूजल वापर वार्षिक भूजल पुनर्भरणाच्या तुलनेत ७० टक्के पेक्षा अधिक आहे. दिवसेंदिवस खोलवर चाललेल्या भूजल पातळीला स्थिरावण्यासाठी आणि उंचावण्यासाठी विहीर तेथे पुनर्भरण हे अभियान राबविणे गरजेचे आहे.यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, कनिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सहाय्यकगट विकास अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, एन जी ओआदींचा समावेश होता.
राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा : कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:26 PM
water scarcity Sangli : छतावरील पाऊस पाणी संकलन व विहिर, विंधन विहीर पुनर्भरन या विषयांवरती दोन सत्रांमध्ये वेबिनार दि. 29 मे 2021 आयोजित करण्यात आला होता. रोजी त्यामध्ये catch the rain where it falls when it falls या ब्रीद वाक्यान्वये राज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा असे आवाहन भूजल विभागाचे राज्याचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
ठळक मुद्देराज्यामध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ उभी करा : कलशेट्टीभूजल संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आवाहन