शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:21 AM

मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलविरुद्ध विनापरवाना रुग्णालय सुरू ठेवून जादा बिलाची आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याबद्दल महापालिकेने ...

मिरज : मिरजेतील अपेक्स केअर कोविड हॉस्पिटलविरुद्ध विनापरवाना रुग्णालय सुरू ठेवून जादा बिलाची आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याबद्दल महापालिकेने गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोग्याधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी याबाबत गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मिरजेतील अपेक्स कोविड हाॅस्पिटलच्या तक्रारीबाबत आरोग्याधिकाऱ्यांच्या पथकाने आठवड्यापूर्वी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली होती. अपेक्स रुग्णालयात उपचाराबाबत रुग्णांच्या तक्रारींमुळे महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास प्रतिबंध करून रुग्णालय बंद करण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. मात्र त्यानंतरही रुग्णालय सुरूच ठेवल्याने व रुग्णालयात जादा बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारीमुळे महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. आंबोळे यांनी रुग्णालयावर छापा टाकून तपासणी केली. यावेळी रुग्णालय बंद करण्याच्या आयुक्तांच्या आदेशानंतरही नवीन रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. आंबोळे अपेक्स केअर रुग्णालयाचे चालक डाॅ. महेश जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. विनापरवाना रुग्णालय चालविले व न केलेल्या उपचाराची बिले घेणे, जादा बिल आकारणी करून रुग्णांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत रुग्णांची फसवणूक व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.