शैक्षणिक संकुलाच्या आवारातील रहिवासी वैशाली अमोल भंडारे व अनिल हणमंत कोळी यांची घरे मंगळवारी (दि. १२) दुपारी हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यास विरोध केल्याने भारती अशोक भंडारे यांना मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. अनिल कोळी यांचे पत्र्याचे शेड पाडून ३० हजारांचे नुकसान करण्यात आल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात वीरेंद्र पाटील व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाऊन घरे पाडण्यास विरोध केला. यावेळी वीरेंद्र पाटील यांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याने या प्रकरणी संबंधितांवर कारवाईसाठी पीडित रहिवाशांसोबत आत्मदहनाचा इशारा अशोक कांबळे यांनी दिला.