याप्रकरणी संशयित अशोक नथू चव्हाण (वय ४२), बाळू जेता राठोड (२५), अरविंद प्रल्हाद चव्हाण (३०, तिघेही रा. माणिकडोह, ता. पुसद, जि. यवतमाळ), बंडू रामदास राठोड (रा. कलदिवे, ता. पुसद, जि. यवतमाळ), पबला लक्ष्मण चव्हाण (४५), संतोष भीमा तुपे (३५, दाेघेही रा. पानवण, ता. माण, जि. सातारा), शेषराव बुद्ध जाधव (४५, रा. काळा पाणी तांडा, दुधाळा, ता. औंढ्या नागनाथ, जि. हिंगोली), प्रवीण सुखदेव तडसे (२४), शंकर सुखदेव तडसे (२५, दोघे रा. पिंपळगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) या संशयित नऊ मुकादमांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे; तर अशोक नथू चव्हाण (४२, रा. माणिकडोह, ता. पुसद, जि. यवतमाळ) या मुकदमांविरोधात कडेगावसह चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
उदय तानाजी कदम (३६, रा. कडेपूर, ता कडेगाव) यांची ७ लाख ८८ हजार, हिंदुराव हंबीरराव शिंदे (६०, रा. कडेगाव) यांची ४ लाख ९० हजार, अमोल तानाजी कदम (३३, रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांची ५ लाख, कैलास बजरंग बाबर (४०, रा. येडेउपाळे, ता. कडेगाव) यांची ८ लाख, संपत हणमंत मोरे (३८, रा, अमरापूर, ता. कडेगाव) यांची साडेपाच लाख, धनाजी धोंडीराम रुपनर (३१, रा. आमरापूर, ता. कडेगाव) यांची ४ लाख, प्रकाश रामचंद्र अभंग (५५, रा. येडेउपाळे, ता. कडेगाव) यांची ६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात नऊजणांविरोधात फिर्याद दाखल आहे. राहुल भालचंद्र शिंदे (४२, रा. वाडियेरायबाग, ता कडेगाव) यांचीही ५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.