शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

निकृष्ट कामास अधिकारी जबाबदार

By admin | Published: November 19, 2015 11:40 PM

समितीकडून ‘टेंभू’च्या कामाची पाहणी : अर्जुन खोतकरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर

विटा : टेंभू योजना खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत. या भागातील दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. टेंभूची कामे निकृष्ट केल्यास क्वालिटी कंट्रोलकडून त्याची तपासणी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य शासनाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला.राज्य शासनाच्यावतीने दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आमदारांच्या अंदाज समिती पथकाने गुरुवारी खानापूर तालुक्यातील माहुली व साळशिंगे येथील टेंभू योजनेच्या कामाची पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मिलिंद माने, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, विधान भवनचे सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव विजय कोमटवार यांच्यासह ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेचे अधिकारी उपस्थित होते. आ. अनिल बाबर यांनी समितीतील आमदार सदस्यांचे विटा येथे स्वागत केले. समितीतील आमदार सदस्यांनी माहुली येथील टेंभू योजनेचा पंपगृह व साळशिंगे येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी समितीतील सदस्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना टेंभूसाठी वापरण्यात येत असलेल्या निकृष्ट साहित्यावरून चांगलेच धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. समितीचे अध्यक्ष खोतकर, वीरेंद्र जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अन्य सदस्यांनी साळशिंगे व माहुली येथे टेंभूच्या कामासाठी जुने साहित्य कसे वापरता? प्रत्यक्ष कामावरील साहित्याची अवस्था अशी कशी आहे? या कामाची निविदा कधी निघाली आहे? किती किलोमीटरमधील क्षेत्राला टेंभूचा लाभ मिळतो आहे? यासह अन्य प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रश्नांच्या भडीमाराने घामाघूम झालेल्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक उत्तरे देत आपली सुटका करून घेतली.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, खानापूर पंचायत समिती उपसभापती सुहास बाबर, खानापूर सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी सभापती सुशांत देवकर, दिलीप कीर्दत, शंतनु बाबर, हेमंत बाबर, रामचंद्र भिंगारदेवे, नंदकुमार माने, सरपंच हेमंत सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)टेंभू योजनेला शासनाने निधी द्यावा : अनिल बाबरसांगली जिल्ह्यातील एक भाग सधन, तर दुसरा आमचा भाग दुष्काळी आहे. शेतकऱ्यांना फक्त टेंभू योजनेच्या पाण्याचाच आधार आहे; मात्र आमचे तालुके पाण्यापासून वंचित राहिले आहेत. विदर्भ-मराठवाड्याच्या अनुशेषाला आमचा विरोध नाही. आमच्या वंचित राहिलेल्या दुष्काळी तालुक्यातील ‘टेंभू’च्या उर्वरित कामासाठी निधी देण्यास समितीने राज्य शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना निधी मागू नका : जगतापराज्यात पश्चिम महाराष्ट्राचा सिंंचनात ७० ते ८० टक्के, तर विदर्भ-मराठवाड्याचा केवळ ७ ते ८ टक्केच रेशो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळींमुळेच सांगली जिल्ह्यातील काही तालुके सिंचनापासून वंचित राहिले. हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या इच्छाशक्तीचा दोष असून, त्यात आमचा दोष नाही. जलसिंचनात राज्याच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्याचा रेशो वाढत नाही व विदर्भ-मराठवाडा सिंचनात सक्षम होत नाही, तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी जास्तीचा निधी मागू नये, असे मत अमरावतीचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.