शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

रस्त्याच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:57 PM

जत/उमदी : सुसलाद (ता. जत) येथील बसवंतराया ऊर्फ निंगप्पा रावसाप्पा बन्नी (वय ५५) यांचा शेतजमीन वादातून कुºहाड, काठी व ...

जत/उमदी : सुसलाद (ता. जत) येथील बसवंतराया ऊर्फ निंगप्पा रावसाप्पा बन्नी (वय ५५) यांचा शेतजमीन वादातून कुºहाड, काठी व लोखंडी गजाने बेदम मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी चार वाजण्याच्या दरम्यान सुसलाद गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बन्नी वस्ती येथे घडली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुसलाद येथील निंगप्पा बन्नी यांचे सख्खे चुलत भाऊ कांतापा मल्लाप्पा बन्नी, मुदका मल्लाप्पा बन्नी व राजू मल्लाप्पा बन्नी यांच्यात शेतातून जाणाऱ्या रस्त्यासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी प्रयत्न केले होते; परंतु वाद मिटला नाही.रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा याच कारणातून त्यांच्यात वाद झाला. या वादातून मारहाण सुरू झाली. कांतापा बन्नी, मुदका बन्नी, राजू बन्नी, रावतू मल्लाप्पा बन्नी व विठाबाई कांताप्पा बन्नी यांनी मिळून निंगप्पा बन्नी यांना काठीने मारहाण केली व ते निघून गेले. जवळच असणारे निंगप्पा यांच्या घरचे व आसपासचे लोक तेथे आले. ते त्यांना जत येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मृत निंगप्पा यांचा मुलगा आमसिद्धा यांनी सातजणांविरोधात रात्री उशिरा उमदी पोलिसांत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संशयित सात आरोपींमध्ये चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. मारहाण करणारे हे मृताचे चुलत भाऊ व पुतणे आहेत.जागेच्या वादाबाबत संख अप्पर तहसील कार्यालयात अपील करण्यात आले होते. हे प्रकरण मागील एक वर्षापासून न्यायप्रवीष्ट असताना संशयित आरोपी हे शेतजमिनीत घर बांधण्याचे काम करत होत. या बांधकामाला निंगप्पा बन्नी यांनी विरोध केला होता. निंगप्पा यांच्या मुलाने शनिवारी उमदी पोलिसांत तक्रारही दिली होती. परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याकडे दुर्लक्ष केले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर ही घटना घडलीच नसती, अशी चर्चा येथे सुरू आहे.कुटुंब हादरलेमृत निंगप्पा बन्नी यांना दोन मुले व दोन मुली आहेत. पत्नी व चार मुलांसमवेत ते मळ्यातील घरात राहत होते. या घटनेने हे कुटुंब हादरून गेले आहे.