शिराळा
: येथील मोरणा धरणामध्ये मगरीचे, तर आसपासच्या ऊस शेतात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसात मोरणा धरणामध्ये ८ ते ९ फूट लांबीच्या मगरीचे वारंवार दर्शन होत आहे. यामुळे येथे येणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही महिन्याच्या अगोदरही या धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या नदीपात्रात व बिरोबा डोहामध्ये मगर दिसली होती. आता धरणामध्ये मगरीचा वावर दिसत आहे. याच परिसरात तसेच पाडळी गावामध्ये ८ ते १० बिबट्यांच्या वावर दिसत आहे. त्यामुळे शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत. या बिबट्यांचा व मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.