अशोक डोंबाळे ल्ल सांगलीजिल्ह्यात २०१७ च्या गळीत हंगामामध्ये १८ साखर कारखान्यांनी २५ मार्च २०१७ पर्यंत ५० लाख ३४ हजार ४५९ टन उसाचे गाळप करून ६० लाख ४० हजार ३३३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखरेचा उतारा १२ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २८ लाख ३२ हजार टनाने कमी गाळप असून ३४ लाख आठ हजार क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भविष्यात साखरेचे दर तेजीत राहण्याची शक्यता असून कारखानदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एप्रिल २०१६ च्या गळीत हंगामात १७ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा उतारा १२.२४ टक्के होता. २०१५-१६ या आर्थिक वर्षात दुष्काळ पडल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले. महाराष्ट्रातच २०१५-१६ या वर्षात दुष्काळाचे संकट निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिकेही वाळून गेली होती. सांगली जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. शासनानेही ऊस पिकासाठी पाणी उपशावर निर्बंध घातले होते. या पार्श्वभूमीवर शेतकरीही अन्य पिकाकडे वळला. कारखानदारांनीही शेतकऱ्यांना बिले देण्यास खूप त्रास दिला आहे. यातूनच उसाचे उत्पादन जिल्ह्यात घटले आहे. यात भर म्हणून कर्नाटकातील साखर कारखानदारांनी काट्यावर पैसे देऊन मोठ्याप्रमाणात ऊस पळविला. या सर्वाचा फटका जिल्ह्यातील साखर कारखानदारीला यावर्षी बसल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१६ च्या गळीत हंगामामध्ये ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा उतारा १२.२४ टक्के होता. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा हंगाम ७ ते ८ एप्रिलपर्यंत चालू होता. उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही विक्रमी झाले होते. याच्या परिणामी साखरेचे दरही मागील दोन वर्षात मोठ्याप्रमाणात कोसळले होते.२०१६-१७ या वर्षात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरूवातीपासूनच अडचणीत होता. जिल्ह्यातील कारखानदारांनी, दराची कोंडी फुटल्याशिवाय गळीत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. तोपर्यंत अन्य जिल्ह्यातील आणि विशेषत: कर्नाटकातील कारखान्यांनी ऊस पळविला. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले.डफळे (राजारामबापू, जत), यशवंत (गणपती संघ, नागेवाडी, ता. खानापूर) या कारखान्यांना सहा दिवसांत गाळप बंद करावे लागले. सांगलीतील वसंतदादा कारखान्यासही महिना ते दीड महिन्यात गळीत हंगाम बंद करावा लागला.जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेला ऊस व साखरकारखाना (मे. टन) ऊस गाळप साखर उत्पादन (क्विं.)उतारावसंतदादा६३२०००६७५०००११.१०राजारामबापू (साखराळे)८१५२६९१०५२६००१२.९०विश्वासराव नाईक५४७५९०६४२१३०११.७५हुतात्मा७०००००९१२५००१३.१९माणगंगा १७२६६८१७७०००१०.३५महांकाली२५७६४०२६९६३०१०.८३राजारामबापू (वाटेगाव)५४०८८६६९३२००१२.८५सोनहिरा६९२५६२८७२२०६१२.६२क्रांती८४६२२४१०५६९३०१२.५०सर्वोदय४४१७७६५७५४००१३.००मोहनराव शिंदे४३०४२५५१७७००१२.००डफळे२७८६४०३०१५००१०.८२यशवंत (गणपती संघ)१६७०००१८००००१०.७८केन अॅग्रो५५००००५८००००११़६०उदगिरी शुगर४२७८००५२७७०७११.७९सद्गुरु श्री श्री शुगर३६६०००४१५०००११़०४एकूण७८६६४८०९४४८५०३१२़२४जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप केलेला ऊस व साखरकारखाना (मे. टन) ऊस गाळप साखर उत्पादन (क्विं.)उतारावसंतदादा८१८००७१४८०८.७४राजारामबापू (साखराळे)५६३०६५७२१७००१२.८२विश्वासराव नाईक३७८५०५४५६०३०१२.०५हुतात्मा५६३६६०७२०६७५१२.७९माणगंगा १६६२१५१६३५५००९.८४महांकाली१५३५२६१६३३३०१०.६४राजारामबापू (वाटेगाव)४०३३९५५०९५००१२.६३सोनहिरा६१५७७५७७५०००१२.५९क्रांती६३५०००७५७८७०११.९३सर्वोदय३५०७४०४४७१२०१२.७५मोहनराव शिंदे२८२२०९३१५५५०११.१८डफळे१२५३८१०८००८.६१यशवंत (गणपती संघ)४३७५२९६६६.७८केन अॅग्रो२५१०७०२८७८१०११़४६उदगिरी शुगर२९४६५०३४४७५०११.७०सद्गुरु श्री श्री शुगर१७७०७०१७४८५७९़८८निनाईदेवी (दालमिया)१००८६६११७४४५११.६४एकूण५०३४४५९६०४०३३३१२़००
जिल्ह्यात २८ लाख टनाने गाळप घटले
By admin | Published: March 26, 2017 10:37 PM