२७नेर्ले०२ : नेर्ले (ता. वाळवा) येथे वादळी पावसामुळे महादेव माने, कृष्णाजी माने यांची उद्ध्वस्त झालेली केळीची बाग.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी पंडित चव्हाण, शंकर बल्लाळ व विजय रोकडे यांनी केले आहे.
एल. व्ही. पाटील यांचे १५ गुंठे क्षेत्रातील पॉलीहाऊस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पूर्णपणे उखडून बाजूला पडल्यामुळे त्यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच महादेव माने व कृष्णाजी माने यांची केळीची बाग मोडून पडली असून सुमारे चार लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र कदम यांच्या लाखो रुपये किमतीच्या पपईच्या बागेचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरचे पत्रे उडाले असून ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, पपई, कलिंगड, भाजीपाला व सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील विजेचा खांब कोसळल्याने काल रात्रीपासून नेर्ले परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुख्य लाईनचे खांब ठिकठिकाणी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.