शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

Sangli: अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यांतील ४८६७ हेक्टरमधील पिके सडली, कृषी विभागाचा अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:53 PM

सर्वाधिक नुकसान कोणत्या तालुक्यात.. वाचा सविस्तर 

सांगली : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली १० हजार ५९२ शेतकऱ्यांची चार हजार ८६७ हेक्टर क्षेत्रातील पिके सडली आहेत. यात सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्यात झाले असून, जत, मिरज तालुक्यांत किरकोळ नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानाची ही आकडेवारी जाहीर केली असून, प्रत्यक्षात नुकसानाचे आकडे आणखी मोठे असणार आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून या नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह दुष्काळी तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. सलग महिनाभर खरीप हंगामातील आढणीला आलेल्या पिकांत पाणी साचून राहिल्यामुळे सखल भागामधील पिके कुजली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, तासगाव तालुक्यात १० हजार ५२१ शेतकऱ्यांचे सर्वाधिक चार हजार ७५१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील ११ शेतकऱ्यांचे ५.६ हेक्टर आणि जत तालुक्यातील ६० शेतकऱ्यांचे ११० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, खानापूर तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, प्रशासनाने अहवालामध्ये नुकसान दाखवलेले नाही. याबद्दलही या परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय पिकांचे नुकसानतालुका - बाधित शेतकरी - क्षेत्र (हेक्टरमध्ये)मिरज - ११ -  ५.६तासगाव - १०५.२१ - ४७५१जत - ६०  - ११०एकूण - १०५९२ - ४८६७.३०

जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतअतिवृष्टी आणि पुरामुळे शिराळा, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांची सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिके सडून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात ही पिके पडलीच नाहीत. यातून शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. शासकीय पंचनामे झाले असून, या नुकसानापोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १० कोटी ९० लाख ३०९ रुपयांची मागणी केली आहे. ही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नसताना पुन्हा अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे पलूस, कडेगाव, वाळवा, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजामध्ये या परिसरात काहीच नुकसान नाही, असा अहवाल आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून अहवाल तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल केला पाहिजे. तरंच त्यांना नुकसान दिसणार आहे. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र