सांगली : फुलांची सुंदर आरास...विद्युत रोषणाईत उजळून गेलेले मंदिर, सुंदर रांगोळी, सुंगधी धूप, अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात आज, मंगळवारी सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात अंगारकी साजरी करण्यात आली. दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.वर्षातील ही पहिलीच अंगारकी असल्याने भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. पंचायतन ट्रस्टमार्फतही गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात आरास व अन्य तयारी करण्यात येत होती. आज, पहाटेपासून मंदिरात रांगा लागल्या होत्या. दिवसभर चंद्रोदयापर्यंत गर्दी कायम होती. पहाटे नित्यपूजा, अभिषेक त्यानंतर आरती तसेच आरती, अभिषेक असे कार्यक्रम पार पडले.अंगारकीनिमित्त सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मंदिरात दाखल झाले होते. मंदिराची आरास कॅमेराबद्ध करण्यासाठीही तरुणांची झुंबड उडाली होती. वर्षातील पहिलीच अंगारकी असल्याने पंचायतन गणपती मंदिर ट्रस्ट व भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यामुळे उत्साहात अंगारकी साजरी करण्यात आली.मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूपमंदिर परिसरात खेळणी, विविध वस्तूंचे स्टॉल्स व पूजा साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा एकच अंगारकीयंदा कॅलेंडर वर्षात एकच अंगारकी संकष्टी आहे. पुढील वर्षी जून महिन्यातच पुढील अंगारकी आहे. यावेळी अश्लेषा नक्षत्रात सर्वार्थ सिध्दी योगात अंगारकी चतुर्थी आली आहे. त्यामुळे हा विशेष प्रबळ योग तयार झाला आहे. अशा प्रकारचा योग साधारण २७ वर्षांनंतर बनतो.
पहिल्याच अंगारकीला सांगलीचे गणपती मंदिर गर्दीने फुलले, मंदिराला विद्युत रोषणाई, फुलांची आरास
By अविनाश कोळी | Published: January 10, 2023 12:03 PM