लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गेले दोन ते तीन दिवस लसीकरण ठप्प झाले होते. यामुळे ही गर्दी दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पेठ गावात ३९६ रुग्ण झाले असून, गुरुवारी ६३ गृहविलगीकरणात आहेत. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर दररोज ७ ते ९ कोरोना रुग्ण सापडत आहेत. असे असताना गावात सर्व व्यवहार सुरू असून, कोणतेही नियम पाळले जात नाहीत. चौकाचौकात युवक, ग्रामस्थ विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सचा नियम पाळत नाहीत. मुख्य बाजारपेठेत भाजीपाला विक्रेते विनामास्क बसलेले असतात. याकडे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.