योजनेचे आवर्तन रखडले : वीजबिल भरण्यास शेतकºयांचा प्रतिसाद नसल्याने परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमिरज : ताकारी, टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले; मात्र वसुलीस प्रतिसाद नसल्याने म्हैसाळ योजनेचे पंप अद्याप बंदच आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी ३४ कोटी थकीत वीजबिलाचा अडथळा आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांचा वीजबिल भरण्यासाठी प्रतिसाद नसल्याने आवर्तन रखडण्याची चिन्हे आहेत.द्राक्षांच्या छाटण्या व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने जानेवारीपासून म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. थकीत वीजबिलाची रक्कम जमा नसल्याने म्हैसाळचे आवर्तन रखडले आहे. वीजबिलाचे ३४ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित आहे. म्हैसाळच्या आवर्तनासाठी यापैकी ५० टक्के थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. टंचाई निधीतून साडेपाच कोटी रुपये मिळणार असून, उर्वरीत साडेबारा कोटी रुपये जमा करण्यासाठी पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू आहे. मात्र प्रतिसाद नसल्याने म्हैसाळचे मार्च महिन्यातही आवर्तन सुरू झालेले नाही. ताकारी योजना सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे. मात्र म्हैसाळच्या आवर्तनासाठी शेतकºयांना रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचे आवर्तन रखडल्याने बागायती पिकांना फटका बसणार आहे.शेतकºयांत संभ्रममाजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज पूर्व भागातील शेतकºयांच्या बैठका घेऊन एकरी दोन हजार रुपये पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यास प्रतिसाद नसल्याने केवळ १० लाख रुपये जमा झाले आहेत. योजनेचे ३० हजार एकर लाभक्षेत्र असून, एकरी दोन हजार रुपये जमा झाले तरीही आवर्तन सुरू होईल, असे योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र विजेची थकबाकी शासनाने माफ करावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.भविष्यात फायदा...दोन वर्षापूर्वी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले होते. दोन टप्प्यात १६० दिवस तब्बल आठ टीएमसी पाण्याचा उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. सिंचन योजनांसाठी ८०-२० या नवीन योजनेप्रमाणे यापुढे शेतकºयांना २० टक्के वीजबिलाची रक्कम भरावी लागणार आहे. मात्र म्हैसाळ योजनेच्या थकीत वीजबिलाच्या समस्येमुळे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.