सांगली : खपली गव्हास मागणी वाढल्यामुळे सांगली मार्केट यार्डात झालेल्या सौद्यामध्ये क्विंटलला पाच हजार २०० दर मिळाला आहे. कमीतकमी चार हजार २००, तर सरासरी चार हजार ७०० रुपये दर मिळाला आहे. खपली गव्हाची २२ हजार ३३४ क्विंटल आवक झाली आहे.
सोयाबीनला तेजी
सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी झालेल्या सौद्यामध्ये सोयाबीनला क्विंटलला पाच हजार ५००, तर हलक्या प्रतीच्या सोयाबीनला पाच हजार रुपये दर मिळाला आहे. सरासरी पाच हजार २५० पर्यंत दर मिळाला. एप्रिल २०२० ते आजअखेर १२ हजार ५३६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोयाबीनच्या दरात आणखी दोन महिने तेजी राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
मटकीला चांगलाच भाव
सांगली : सांगली मार्केट यार्डात शनिवारी झालेल्या सौद्यामध्ये मटकीला १२ ते १० हजार रुपये दर मिळाला. सरासरी ११ हजार रुपये दर मिळाला आहे. आजअखेर आठ हजार ५५३ क्विंटल मटकीची आवक झाली होती. मटकीला चांगलाच भाव असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. मटकीची आवक कमी असल्यामुळे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुळाला तेजी कधी येणार?
सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी एक हजार ४९ क्विंटल गुळाची आवक झाली होती. या गुळाला प्रति क्विंटल दोन हजार ८०० ते तीन हजार ८४१ रुपये दर मिळाला आहे. सरासरी तीन हजार ३२१ रुपये दर मिळाला आहे. शनिवारअखेर चार लाख ९५ हजार २४९ क्विंटल गुळाची आवक झाली आहे.
बेदाण्यास किलोला २३४ रुपये दर
सांगली : मार्केट यार्डात शनिवारी झालेल्या सौद्यामध्ये चांगल्या बेदाण्यास किलोला २३४ रुपये दर मिळाला आहे. क्विंटलला सहा हजार ते २४ हजार ४०० रुपये दर मिळाला आहे. सरासरी १४ हजार ७०० रुपये दर मिळाला आहे. दिवसात १२ हजार १८७ क्विटंल बेदाण्याची आवक झाली होती. बेदाण्याच्या दरात मागील आठवड्यापासून वाढच होत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.