शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

उत्सुकता शिगेला, उमेदवारांचे देव पाण्यात!

By admin | Published: May 13, 2014 11:08 AM

लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सांगली व हातकणंगले मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

 

सांगली : लोकसभेच्या निकालासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सांगली व हातकणंगले मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात घातले आहेत. पैजा व सट्टाबाजारही जोरात चालू झाल्याने सर्वांचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे.  अपराजित राहिलेल्या काँग्रेसच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात प्रथमच इतकी चुरस निर्माण झाली आहे. विजयाबाबत कोणालाही ठामपणे दावा करता येऊ नये, इतपत काट्याची लढत या मतदार संघात झाली आहे. त्यामुळे दुतर्फा पैजांना पूर आला आहे. निकालाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवार व त्यांच्या सर्मथकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व भाजपचे संजय पाटील यांच्यातील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून प्रतीक पाटील यांच्यासह वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी जोरदार ताकद लावली आहे. दुसरीकडे संजय पाटील यांच्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांबरोबरच खुद्द पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प्रचारात भाग घेतल्याने, भाजपच्यादृष्टीनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या दोन्ही उमेदवारांशिवाय आम आदमी पार्टी, जनता दल व काही अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. या सर्व उमेदवारांना किती मते मिळणार आणि त्याचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार, यावरूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत.  येत्या १६ मे रोजी निकाल लागणार असल्याने उमेदवारांनी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांचे कुटुंबीय व कट्टर सर्मथकांकडूनही नवस बोलले जात आहेत. मतदान झाल्यानंतर काही उमेदवारांनी कुलदैवतासह मोठमोठय़ा देवस्थानांना, तीर्थस्थळांना भेटी देऊन विजयासाठी साकडे घातले होते. प्रचारादरम्यान जशा फेर्‍या झाल्या, तशी देवाकडेही आता दुसरी फेरी काहींनी पूर्ण केली. देवाला साकडे घालताना ज्योतिषांच्या दरबारीही उमेदवार भेटी देत आहेत. एक, दोन नव्हे, तर अनेक ज्योतिषांकडून विजयाची आणि भविष्याची खातरजमा करण्यात उमेदवार गुंग आहेत.  ग्रहांची स्थिती आणि अंकशास्त्राची जुळवाजुळव करून, आपल्याला विजय कसा मिळू शकतो, याबाबत चौकशा सुरू आहेत. काट्याच्या लढतीमुळे या मतदार संघात मोठय़ा प्रमाणावर पैजा व सट्टा लागला आहे. लाखो रुपयांचा डाव निकालावर खेळला जात आहे. एकूणच निकालापूर्वी राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. (प्रतिनिधी) भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाभर जाळे आहे. मतदानानंतर याच कार्यकर्त्यांमार्फत मतांचा अंदाज उमेदवारांनी घेतला होता. निकाल जवळ आल्याने पुन्हा एकदा आढावा घेण्यात येत आहे. तालुकानिहाय आकडेमोड करून विजयाबाबतची खातरजमा करण्यासाठी खास यंत्रणा कामाला लागली आहे. निकाल जवळ येत असला तरी उमेदवारांचा आढावा सुरूच आहे. पक्षीय स्तरावर अनेक नेत्यांच्या भूमिकेबद्दल शंकाही व्यक्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावांचा अंदाज अजूनही उमेदवारांना बांधता आलेला नाही. काँग्रेस व भाजपच्या उमेदवारास अशा काही गावांचा अंदाज अजूनही आलेला नाही. सोशल मीडियावर दावे निकाल चार दिवसांवर आल्याने सोशल नेटवर्किंग साईटस्वरून विजयाचे दावे सुरू झाले आहेत. उमेदवारांच्या सर्मथकांनी सोयीचे आकडे व अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही ज्योतिषी व अंकशास्त्र तज्ज्ञांनी ग्रहांची स्थिती व अंकगणिताच्या आधारावर तालुकानिहाय उमेदवारांना मिळणार्‍या मतांचे आकडे टाकले आहेत. त्यांनीही आपल्या भाकिताबाबत दावा केला आहे.