म्हैसाळ : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिंलिंद नाईक,कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे प्रमुख उपस्थित होते.सध्या उन्हाची दाहकता वाढत चालली आहे.त्यामुळे शेतीला पाणी टंचाई निर्माण झाली होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून चालली असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावी अशी मागणी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी शेतकऱ्यांची ही समस्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज म्हैसाळचे पंप सुरू करण्यात आले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी दळवी,युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कार्यध्यक्ष वास्कर शिंदे, मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार, विधानसभा क्षेत्राचे कार्यध्यक्ष गंगाधर तोडकर, सलगरेचे उपसरपंच सुरेश कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष महावीर खोत, मिडीया प्रमुख पृथ्वीराज सावंत, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतातील विहीर व कुंपननलिका यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले.- मनोज शिंदे-म्हैसाळकरअध्यक्ष, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना