लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल अनुदान वाटपात झालेला नियमबाह्य कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. या प्रकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.गटविकास अधिकाºयांनी बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सायकल पुरवठा करणारा पुरवठादार आणि संबंधित कनिष्ठ अभियंत्याला नोटीसदेखील बजावण्यात आली आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींसाठी सायकल अनुदान वाटप करण्यात आले होते. मात्र तासगावात अनुदान वाटपाचा कागदोपत्री खेळ करुन लाभार्थ्यांना सायकलींचा पुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी लाभार्थ्यांकडून तीनशे रुपये गोळा करण्यात आले होते; तर सायकलच्या प्रस्तावासोबत कर्मचाºयांकडून जोडण्यात आलेली बिलेदेखील बोगस असल्याचे चव्हाट्यावर आले होते. पंचायत समितीतील हा गोलमाल ‘लोकमत’मधून उघडकीस आणला होता. या बातम्यांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशानुसार जाधव यांनी बाल विकास प्रकल्पच्या बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना सायकल वाटप प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी संबंधित कनिष्ठ सहाय्यकास नोटीस दिली असून, मंगळवारी हा अहवाल गटविकास अधिकाºयांना सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.सायकलींचा दर्जा तपासणारसायकलींचा पुरवठा करण्यासाठी जोडण्यात आलेली बिले नवेखेड येथील अभिमन्यू सायकल मार्ट या पुरवठादाराच्या नावाने आहेत. प्रत्यक्षात यांचे सायकल दुकान नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी जाधव यांनी संबंधित पुरवठादारास नोटीस दिली असून, पुरवठ्याबाबतचा अहवाल मागविला आहे. तसेच पुरवठा झालेल्या सायकलींचा दर्जा आणि गुणवत्तेची तपासणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
सायकल घोटाळा; चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:22 AM