जिल्हा परिषद इमारत नूतनीकरणाच्या कामासाठी एकत्रित अंदाजपत्रक न करता कामाचे तुकडे करण्यात आले. सर्व इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यांकन केल्यास भ्रष्टाचार उघडकीस येईल. इमारतीच्या नूतनीकरणाची काही कामे मजूर सहकारी सोसायट्यांना देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात सोसायट्यांनी ती कामे न करता सबठेकेदार नेमून कामे केली आहेत. सोसायट्यांच्या बँक खातेचा तपशील पाहिल्यास सबठेकेदाराला चेक दिले असल्याचे निष्पन्न होईल. सिद्धनाथ मजूर सहकारी संस्था, आरग, गणेश मजूर सहकारी संस्था, लिंगनूर या संस्थांचे बँक खाते व लेखापरीक्षण अहवाल पाहून कागदोपत्री संस्थांनी कामे न केल्याचे निदर्शनास येईल. चुकीच्या पद्धतीने काम केल्यास संस्थांच्या नोंदणी रद्द करावी. त्या संस्थांना काळ्या यादीत टाकणेत यावेत.
याबाबतची गैरव्यवहाराच्या अहवालाची प्रत देऊन नोंदणी रद्द करून पदाधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्षा वनिताताई कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, जिल्हासंपर्कप्रमुख महेश देवकुळे, शहराध्यक्ष रामभाऊ पाटील, सागर चव्हाण, प्रशांत हनुमान, अजित आवळे, सुशांत काळे, नर्मदा साळुखे, अलकाताई शिकलगार आदी उपस्थित होते.